पोस्ट्स

शेतकरी राजा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकरी......जगाचा पोशिंदा. ..🌾🌽🌿🌿🌾🌲

इमेज
पोशिंदा. .....जगाचा...🌱🌱🌾🌾🌽🌿🌾   गडगडावे ढग काळेभोर. ....... सोबत कडकडाट विजांचा आणि मग..........पाऊस घनघोर......... लगेच खुश होतो तो...... धगधगत्या काळ्या मातीवर पाणी  पडावं ........तसा त्याचा चिंतातूर जीव कसा शांत होतो.... बरसत्या  सरी बघून. ....... हुरूप येतो त्याला ....मग तो उत्साहानं सुरूवात करतो शेतीला...... आपल्या काळ्या मातीला घडवतो तो ....आशेचं नवीन रोप उगवण्यासाठी....... जोमाने तयारी करतो तो......... बैल जुंपतो तो डौलदार. ...नांगरही असतो  कि तयार......! कसं बहरलेलं वाटतं त्याला शेत शिवार..... साधी हवाही त्याला उर्जा देते  वेगळी. ......... अंगातच जणू वीज संचारते त्याच्या. ....... जमिनिची मशागत फारच उत्साहाने करतो.... किती आस्मानी -सुलतानी संकट जरी आलं तरी..माझा शेतकरी त्याला पुरून उरतो..... कोपरानकोपरा छान नांगरतो.... कण न कण मातीचा जणू त्याच्याशी बोलत असतो.......... पेरणी नंतर अशी बेभान होऊन करतो...... धान्य हातातलं  फार आशेनं आपल्या काळ्या आईच्या हाती सोपवतो..... निसर्गराजा कधी दुष्काळ कधी अतिवृष्टीनं त्याला बेजार करतो...... तो थकतो कधीकधी,...