शेतकरी......जगाचा पोशिंदा. ..🌾🌽🌿🌿🌾🌲




पोशिंदा. .....जगाचा...🌱🌱🌾🌾🌽🌿🌾


 गडगडावे ढग काळेभोर. .......
सोबत कडकडाट विजांचा आणि मग..........पाऊस घनघोर.........
लगेच खुश होतो तो......

धगधगत्या काळ्या मातीवर पाणी  पडावं ........तसा त्याचा चिंतातूर जीव कसा शांत होतो....
बरसत्या  सरी बघून. .......

हुरूप येतो त्याला ....मग तो उत्साहानं सुरूवात करतो शेतीला......
आपल्या काळ्या मातीला घडवतो तो ....आशेचं नवीन रोप उगवण्यासाठी.......

जोमाने तयारी करतो तो.........
बैल जुंपतो तो डौलदार. ...नांगरही असतो  कि तयार......!
कसं बहरलेलं वाटतं त्याला शेत शिवार.....

साधी हवाही त्याला उर्जा देते  वेगळी. .........
अंगातच जणू वीज संचारते त्याच्या. .......
जमिनिची मशागत फारच उत्साहाने करतो....
किती आस्मानी -सुलतानी संकट जरी आलं तरी..माझा शेतकरी त्याला पुरून उरतो.....

कोपरानकोपरा छान नांगरतो....
कण न कण मातीचा जणू त्याच्याशी बोलत असतो..........

पेरणी नंतर अशी बेभान होऊन करतो......
धान्य हातातलं  फार आशेनं आपल्या काळ्या आईच्या हाती सोपवतो.....

निसर्गराजा कधी दुष्काळ कधी अतिवृष्टीनं त्याला बेजार करतो......
तो थकतो कधीकधी, पण मुलांकडे  बघून आपल्या  .......जोमानं उठतो.....
पण  कधीकधी जीव देतो गळफास घेऊन. ........
निशब्द करतो तेव्हा. ........

पेरलेल्या  धान्यावर  पाऊस पडताना तो आनंदाने बघतो......
लहान बाळासारखं आतल्या बियाणाला जपतो......

टोळधाडीसारख्या संकंटांबाबत तो सतर्क असतो ...
सरकार काही करेल न करेल. .पण तो त्यांच काम करायला जिद्दीने तयार असतो....

जेंव्हा जीव धरतात रोपं..
येतात हळुवार जमिनीवर. .....
किती समाधान वाटतं त्याला .माहीतीये  ...हे  पाहिल्यावर. .....

कधीकधी वाटतं. ..त्याच्यासारखं संयमी मन कोणाचं असेल.....?
जशी बाळ मोठ्ठं होईपर्यंतची त्याच्या मनातली धडधड आपल्याला कशी समजेल....!

तो खतपाणी करतो वाढत्या रोपाला.....
आशेचं. ....मेहनतीचं........
जेव्हा ही रोपं धान्य तयार करतात ना भरभराटीचं........
तेव्हा त्याला जो आनंद होतो  तो खरच जगावेगळा असतो........

तो खरा श्रीमंत असतो .....
कष्टाची. .स्वाभिमानाची भाकरी खाणारा तो एकमेव प्रामाणिक जीव असावा असं वाटतं....

वर्षभर मेहनत करून तो जगाला धान्य पुरवतो.....
अनेकांची पोटं भरतो तुडुंब. ...!
स्वतः मात्र परिस्थितीशी भांडतो......
संकटांशी दोन हात करतोच ,
पण आपल्या पोरांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी किती
कर्जाच ओझं वाहतो....
तेव्हा मात्र तो फारच दमलेला असतो......
अशावेळी त्याला खरी गरज असते मदतीची...

वाटतं एवढंच. ......
त्याच्या मेहनतीचा त्याला मोबदला मिळावा...
त्याच्या कष्टाचा आदर व्हावा.....
त्याचा साधाभोळा स्वाभिमान जपला जावा.....
त्याला जगवता ..टिकवता यायला हवं...
कारण तो नाही तर ....तर काहीच नाही....हो.!
सर्व लोक आरामात ...त्याला विश्रांती नाहीच....
त्याला डावलून आपण सुखी राहू  शकतो का...?
ह्याचा विचार  करायला हवा...
शेतकरी बांधवांच जगणं समृद्ध करायला हवं. ..


कारण आणीबाणीतही तो राबतो आहे...
बंद आहे प्रत्येकाचा कामधंदा. ..
तरीही पोटतिडकिने राबतोय हा जगाचा पोशिंदा .......
चला न्याय देऊया त्याच्या कष्टाळू मनाला...........





                 -@कुणाल विजय ठाकरे. ...













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Memories.....😍💚💛❤❤