निशब्द •••••
"अरे मिञा, कसा आहेस तू? हल्ली मला खूप वेगळा वाटतोयस तू, हसतही नाहीस रे फारसं,का बरं? बोल ना झालंय तरी काय असं? माझं तर वेगळच इकडे, मला हसायला कारणच लागत नाही ! सगळं कसं प्रसन्न वाटतं ना! बरं तू फारसं मोकळं बोलतही नाहीस, मी तुला मोठ्ठं होताना पाहतोय,तुझ्यात तो ठामपणाच दिसत नाही रे हल्ली ,आपलं मत बिनधास्त मांडण्याचा! हा प्रामाणिकपणा तुझ्यातला मला फार आवडतो किती खरा आहेस न तू इतरांपेक्षा! तू ना मला बोलबच्चनही वाटत नाहीस, पण ना अरे माणसाने नेहमी व्यक्त व्हावं, बोलावं ,नाही तर तु घडशील कसा ?पटतय नं? तुझ्यातली शांतता खायला उठते कधीकधी! माणसाने मनाने शांत ,स्थिर रहावं , आणि तरीही बोलकं रहावं म्हणजे कसं सकारात्मक वातावरण तयार होतं. तू हल्ली न्यूनगंडात असल्यासारखं वाटतोयस पण खर सांगू आपण स्वतःच आपल्या संकटाचं कारण असतो . कधी ताण घ्यायचा ,कधी शिव्याच द्यायच्या, आत्मविश्वासच गमवायचा , पण ही तर दुबळ्या माणसाची लक्षणं तु तर कणखर आहेस ना? मग उशीर करू नकोस ,तुझ्या व्यक्तिमत्वाला मेहनतीची ,व्यवहाराची जोड दे,...