निशब्द •••••
"अरे मिञा, कसा आहेस तू?
हल्ली मला खूप वेगळा वाटतोयस तू,
हसतही नाहीस रे फारसं,का बरं?
बोल ना झालंय तरी काय असं?
माझं तर वेगळच इकडे,
मला हसायला कारणच लागत नाही !
सगळं कसं प्रसन्न वाटतं ना!
बरं तू फारसं मोकळं बोलतही नाहीस,
मी तुला मोठ्ठं होताना पाहतोय,तुझ्यात तो ठामपणाच
दिसत नाही रे हल्ली ,आपलं मत बिनधास्त मांडण्याचा!
हा प्रामाणिकपणा तुझ्यातला मला फार आवडतो
किती खरा आहेस न तू इतरांपेक्षा!
तू ना मला बोलबच्चनही वाटत नाहीस,
पण ना अरे माणसाने नेहमी व्यक्त व्हावं, बोलावं ,नाही तर तु घडशील कसा ?पटतय नं?
तुझ्यातली शांतता खायला उठते कधीकधी!
माणसाने मनाने शांत ,स्थिर रहावं ,
आणि तरीही बोलकं रहावं म्हणजे कसं सकारात्मक
वातावरण तयार होतं.
तू हल्ली न्यूनगंडात असल्यासारखं वाटतोयस
पण खर सांगू आपण स्वतःच आपल्या संकटाचं कारण असतो .
कधी ताण घ्यायचा ,कधी शिव्याच द्यायच्या,
आत्मविश्वासच गमवायचा ,
पण ही तर दुबळ्या माणसाची लक्षणं
तु तर कणखर आहेस ना?
मग उशीर करू नकोस ,तुझ्या व्यक्तिमत्वाला मेहनतीची ,व्यवहाराची जोड दे,
कारण तसा तू खूप छान, परिपूर्ण दिसशील!
आणि हो तुझ्यातला नवीन माणूस तुला नक्कीच सापडेल!
आत्मविश्वासाचं म्हणशील तर,
तू हिम्मत कर फक्त, नवं करण्याची ऊर्मी येईल तुझ्यात आपोआप.
आपल्यातली भीती, संकोच, राग ह्या सगळ्यावर
मात कर आणि बघ स्वतःला आरशात,
खरंच खूप सुंदर दिसशील!
तुला येत नाही त्याची तू काळजी नको रे करू,
उलट त्यातून तू शिक,
स्वतःच्या यशापयशाची जबाबदारी तू स्वतःच घेऊन बघ बरं वाटेल तुला!
तरच पाय रोवून उभं राहता येइल तुला ह्या बदलत्या जगात ,
बाकी तू समजूतदार आहेस, स्वतःला नव्याने शोध
सर्व काही आयुष्यात, ते जगता यायला हवं रे मनापासून!
ध्यास सोडू नकोस ;जगण्यावर कायम प्रेम करत रहावं
हो खूप मज्जा येते आयुष्य घडवायला!
आणि हो वेळ आणि माणूस खूप शिकवतात सतर्क राहून शिक ते!
Be a explorer ,नवीन गोष्टी नव्याने शिकत रहा
दोन्ही हात हवेत पसरवून, आनंदाने म्हण,
" Love you zindagi ,a lot"
हे आयुष्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,मी तुला खूप छान बनवेन!
कायम तुझंच,
तुला जागं करणारं ,तुझ्याच भरण्यासाठी
सतत धडधडत असणारं ,
भाबडं ,प्रेमाने भरलेलं गोड असं
तुझं मन😊.
पत्ता-हृदय बंगला,दिल की गली समोर,खंबीर मन
चौकात, मनाचे सूरच्या बाजूला. ..
-कुणाल विजय ठाकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा