❤❤❤




प्रिय आई- वडिलांस .....समर्पित. .....🙏


"नमस्कार कसे आहात....तुम्ही. ....?
एरव्ही आपण बोलतो खर......पण ..एवढं मनमोकळं... 
हो....मला बोलायचं आहे तुमच्याशी..........!

किती गोष्टी करत असता तुम्ही कायम आमच्यासाठी. ........
मला मात्र अजब वाटत ....एवढं निस्वार्थ कोणी कसं असू शकत..?
सभोरच्या  स्वार्थी जगात मला तुमचा फार आधार वाटतो.......नाही नाही. ...तुम्ही आधाराच्याही पलीकडे आहात.......
लहानपणापासून खूप जपून मुलांना घडवणं......
तेही डोळ्यात तेल घालून. ........अस खूप सहज बोलतात..लोक......
पण खरच तुम्ही ते जगता अक्षरशः. ......
मी निशब्द आहे तुमच्या बलिदानापुढे.......
तुम्ही ओरडलात चूक झाल्यावर कि.....राग येतो खूप. ..तुमचा कधिकधी. ..........
पण तुमचे आमच्यासाठी कष्ट बघून .......
तुमच समर्पण कळत....जाणवत...खोल....
मी ना तुम्हाला कधी ....रडताना पाहिलेच नाही.....
मला मात्र जरा काही झालं ना कि रडूच येत......
तुमचा  सार्थ अभिमान. ....आदर वाटतो आम्हाला. .....
तुमचे विचार. .......खरेपणा .....आम्हीही असाच जगू....असं सांगावंसं वाटतं........
कळत नकळत मी उलट-सुलट बोलून जातो...तर मला माफ कराल......?
कोणी म्हणत ,आई-वडिलांनी. .मिञासारख वागवाव...
मुलं मोठ्ठी झाल्यावर.....
आमच्या मनात अजूनही आदरयुक्त भीतीच  आहे हो.......
थोडा वेळ लागेल खरा......
पण हा तुम्ही आमचे मित्रच आहात मनाने......कायम..
तुमच्या खूप अपेक्षा आहेत.....माझ्याकडून. ...
मला माहितीये कि त्या खूप साध्या आहेत....
मी नक्की पूर्ण करेन त्या......
मलाही वाटत खूप आतून खूप काही करावं ...तुमच्यासाठी. .........आणि मी करेन......
तुमच्या कणखर डोळ्यात मला आनंदाश्रू  बघायचे आहेत आणि मी स्वतःला एवढं योग्य बनवेन की तोही.. दिवस येईलच.........
मलाही वाटतं .......कधीतरी. ..कि मीही तुमच्या इतका ....जबाबदार असू शकेन का??
हो ....   ..मन म्हणत नक्की ......😊असू शकेन...
मलाही ही विश्वास आहे......मी स्वतःला..
आदर्श माणूस नक्की बनवेन..........
आत्ता मला प्रत्येक सेकंद तुम्हाला जगायचं आहे.....
मला शिकायच्या आहेत खूप गोष्टी तुमच्याकडून.....
तुमचं असणं  जगायचं आहे....प्रत्येक सेकंद. ....
मी भाग्यवान आहे माझे गुरु आहेत माझ्याजवळ. ...
मनात..विचार येतो त्यांच काय?...ज्यांचे आईवडील 
लहानपणीच सोडून गेलेले आहेत.......
खूप खूप प्रेम तुम्हा दोघांनाही......
तुमचा कायम ऋणी आहे.......आणि राहीन......
तुम्हीच माझे गुरु. ...... सर्वकाही. .......
...............

तुमचाच.........अंश.......भाबडा......





                        -कुणाल विजय ठाकरे. 
..





 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Memories.....😍💚💛❤❤