तु प्रयत्न करत रहा.....😍😍




तु प्रयत्न करत रहा........😊

तु प्रयत्न करत रहा. .......
तुच सापडशील तुला नव्याने. ..

तु प्रयत्न करत रहा..
तुझ्यातले बदलच तुला जाणवतील..नव्याने 

तु प्रयत्न करत रहा..
तुझं असणंच सुंदर होऊन जाईल नव्याने. ...

तु प्रयत्न करत रहा..
अपयशही हार मानेल तुझ्यापुढे....

तु प्रयत्न करत रहा..
आपोआप मजबूत होशील तू शरीराने. .....मनाने.....

तु प्रयत्न करत रहा..
आभाळही ठेंगणं होइल तुझ्यापुढे. ...

तु प्रयत्न करत रहा......
आव्हानही आवडू लागतील रे हळूहळू तुला....

तु प्रयत्न करत रहा...
यशाची एक नवीन भाषा कळेल तुला.........

तु प्रयत्न करत रहा..
प्रत्येक अनुभव समृद्ध बनवेल तुला. ......

तु प्रयत्न करत रहा.....
जगणं नव्याने फुलताना दिसेल तुला.....


तु प्रयत्न करत रहा..
तुला कळणार ही नाही  कधी प्रेरणा होशील तू इतरांसाठी. ......

तु प्रयत्न करत रहा.....
वेळेच महत्व पटेल तुला.......

तु प्रयत्न करत रहा.....
कोणी नाही बघितली तरी चालेल..पण हा ,बदलाचा
भाग होशील तू.......

तु प्रयत्न करत रहा.....
तु नक्कीच काहीतरी नवीन घडवशील....

तु प्रयत्न करत रहा ....
तुझ्यातल्या क्षमता नव्या रूपात दिसतील तुला....

तु प्रयत्न करत रहा......
प्रत्येक सेकंद नवीन ऊर्जा तुझ्यात जाणवेल तुला....

तु प्रयत्न करत रहा..
तेच तुला धडपडायला शिकवतील....
तुला स्वतःला शोधायला मदत करतील.......


तु प्रयत्न करत रहा.. 
कारण हे प्रयत्नच तुझं आयुष्य सुंदर करतील...
तुला ते सर्व काही मिळवून देतील...
जे तुझ आयुष्य बदलून टाकेल.......
तुला तुझ्याच नजरेत मोठ्ठं करतील......
तुला एक चांगला माणूस बनवतील........

म्हणून तू  कायम प्रयत्न करत रहा..😊👍👍👍


                -कुणाल विजय ठाकरे. 









 


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Memories.....😍💚💛❤❤