मन्मनी. .........💚💚💚

मन्मनी. ...😙😙😙😙



मन्मनी. ...........💚💚💚

 गीत गुणगुणावेसे वाटावे.............
जुन्या शब्दांनीही नव्याने बहरावे.......
अन्  सहज हसू ओठांवर फुलावे......मन्मनी. ....

आधी स्वतःला जगावेसे वाटावे.....
आपल्याच प्रेमात पुन्हा पडावे. ...
जगणे जगणे न रहावे ............मन्मनी. ......

गुरफटुन स्वतःत  वेगळेच सूर यावे............
स्वच्छंदी नजरेत ह्या श्रावणसरींनी वहावे. .....
माझे -मी न  राहता जग निराळे वाटावे. ....मन्मनी. ....

धडधडत्या  श्वासात ह्या असणे सुगंधित व्हावे. .....
उमलत्या मनात ह्या समाधान बागडावे.....मन्मनी. ..

रस्ते समोरचे शांत दिसावे.......
पाठलाग त्यांचा करताना पावलांनी मात्र धावत सुटावे......मन्मनी. .........


असणे स्वतःचे दिसूच नये........
आपणच आपले फितूर व्हापेवे. ........
शरीर इथेच .....मन माञ पक्ष्यासारखे..कुठेतरी. .उडून गेलेले असावे.........मन्मनी. ............

एकरूप निसर्गाशी व्हावे. .....
भान स्वतःचे सुटावे.......
छुपे प्रतिबिंब मनातले नव्याने समोर यावे......
वास्तवात क्षण हे आभासी वाटावे.....मन्मनी. ...

खोल डोहात मनाच्या. .....पार पैलतीर जावे......
असूनही नसल्यासारखे ......जाणिवांचे हे अनोखे सोहळे जगावे.....
जगणे सतत हवेहवेसे वाटावे .........
हळुवार कोपरे मनाचे सहज उलगडावे........मन्मनी. . .......




                 -   कुणाल विजय ठाकरे. 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Memories.....😍💚💛❤❤